scorecardresearch

एलॉन मस्कच्या ‘ब्लू टिक’ची कृपा! मिथुन चक्रवर्तींचं ट्विटर हँडल सोडून अमिताभ बच्चन करतायत ‘मैथुन’ला फॉलो!

Twitter Blue Tick! अमिताभ बच्चन, स्मृती इराणी मिथून चक्रवर्तींऐवजी ‘मैथून’ला करतात ट्विटरवर फॉलो, नेमका गोंधळ काय?

एलॉन मस्कच्या ‘ब्लू टिक’ची कृपा! मिथुन चक्रवर्तींचं ट्विटर हँडल सोडून अमिताभ बच्चन करतायत ‘मैथुन’ला फॉलो!
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शनची घोषणा केली होती. त्यानुसार, सुरुवातीला आयफोन युजर्ससाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शन ऑफर देण्यात आली होती. आता अँड्रॉइड युजर्सनाही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. युजर्सना अकाउंट व्हेरिफाइड दिसण्यासाठी लागणाऱ्या ब्लू टिकसाठी महिन्याला ९०० रुपये मोजावे लागतील.

महेश भट्ट यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, मुलगा राहुल माहिती देत म्हणाला…

मस्क यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली होती. कारण पैसे भरून कोणीही ब्लू टिक मिळवू शकतं, परिणामी फेक अकाउंट्सदेखील व्हेरिफाइड दिसतील, असं टीकाकारांचं म्हणणं होतं. याचंच एक उदाहरण पाहायला मिळालं आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा फोटो डीपीला लावलेलं ‘मैथून’ नावाचं एक अकाउंट व्हेरिफाय झालंय. त्या युजरने ‘मिथून यांचं ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड नाही, पण माझं झालंय’, असं ट्वीट केलंय. ते ट्वीट जोरदार व्हायरल झालं आहे.

महत्त्वाचं म्हणजे मिथून यांच्यापेक्षा मैथून नावाच्या युजरचे जास्त फॉलोअर्स आहेत. मिथून यांचे ४५ हजार फॉलोअर्स असून मैथून नावाच्या या युजरचे ट्विटरवर साडेतीन लाख फॉलोअर्स आहेत. या फॉलोअर्समध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, स्मृती इराणी, अमित मालवीय हे लोक या युजरला ट्विटरवर फॉलो करतात.

maithun followers
(फोटो – ट्विटर स्क्रीनशॉट)

दुसरीकडे, अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचं ट्विटर अकाउंट तपासलं असता, तेदेखील व्हेरिफाइड आहे. पण, जे सेलिब्रिटी मैथून नावाच्या अकाउंटला फॉलो करतायत, ते मिथून चक्रवर्तींच्या ऑफिशिअल अकाउंटला फॉलो करत नाहीत.

अकाउंटचं नाव सारखं असल्याने अनेकांना हे मिथून चक्रवर्तींचं खरं अकाउंट वाटत आहे. मिथून चक्रवर्ती ट्विटरवर फार सक्रिय नाहीत. त्यांचं शेवटचं ट्वीट ४ मे २०२१ रोजी केलेलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 10:56 IST

संबंधित बातम्या