फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यामध्ये सुरु असलेला वाद संपायचं नाव घेत नाहीये. नेहा ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेकनंतर सतत चर्चेत आहे. खरं तर, लोकांना या गाण्याचं नवीन व्हर्जन आवडलेलं नाही. सोशल मीडियावर नेहा कक्करला सारखं ट्रोल केलं जात आहे. या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठक हिनेही या नव्या व्हर्जनवर टिका केली आहे. त्यावरून या दोघींमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. आता फाल्गुनी पाठक हिने नेहाने कक्करने हे गाणे बनवल्याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. गाण्याचे वेगळे व्हर्जन तयार करण्याबद्दल तिचा काही आक्षेप नसल्याचे म्हणत तिने यु-टर्न मारला आहे. मात्र हे सगळं सांगत असताना तिने त्यात एक ‘पण’ लावला आहे.

आणखी वाचा : “….तेव्हा अमेरिकेचा शोधही लागला नव्हता,” आपल्या भाषणाने चियान विक्रमने वेधले लक्ष

मिरची प्लसला दिलेल्या एका मुलाखतीत फाल्गुनीने नवीन गाणी तयार करण्याबद्दल तिचे मत व्यक्त केले. नेहा कक्करचे नाव न घेता फाल्गुनी म्हणाली, “एखाद्या गाण्याचं नवीन व्हर्जन तयार करायचं असेल तर ते चांगल्याप्रकारे करा. रिमिक्स करा पण ते चांगलं होईल असं करा. उगाच ते गाणे खराब कशाला करायचे?”

फाल्गुनीचे ‘मैंने पायल है छनकाई हे गाणे अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे असेही तिने सांगितले. ती म्हणाली, “आजही मी जेव्हा ते गाणे गाते तेव्हा मला प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळते जेवढे पहिल्या दिवशी मिळत होते. प्रेक्षक त्या गाण्याला यमक जुळवून नवीन व्हर्जन तयार करू शकतात. पण त्यांनी ते चांगले केले पाहिजे. गाण्याची सुंदरता आणि त्याचा साधेपणा याला कुठेही धक्का लागता कामा नये.”

हेही वाचा : “मी आज जे काही कमावलं…” ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेक वर्जनवरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा कक्करचं सडेतोड उत्तर

नुकतेच नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ९० च्या दशकातील लोकप्रिया गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चा रिमेक आहे. नेहासह क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि अभिनेता प्रियांक शर्मा देखील म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले आहेत. नवीन व्हर्जन बॉलिवूड रिमिक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं आहे. मात्र, हे गाणे समोर आल्यापासून नेहा कक्करला प्रचंड ट्रोल केले जात आहे. तिचं हे गाणं कोणालाच आवडलेलं नाही. त्यावरून फाल्गुनी पाठक हिनेही नेहावर आक्षेप घेतला आहे.