दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेता मन्सूर अली खानचा मुलगा अली खान तुगलक याला अटक झाली आहे. बंदी घातलेले ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि विक्री केल्याप्रकरणी त्याला इतर नऊ जणांसह अटक करण्यात आली आहे. ‘ओजी’ नावाने हे गांजा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री करत होते. पोलिसांच्या एका विशेष पथकाने केलेल्या तपासानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, झिदान झुबीन या टोळीचा मुख्य सूत्रधार होता. त्याच्या चौकशीत अधिकाऱ्यांना अधिक माहिती मिळाली आणि पुढे तपास करण्यात आला. त्याच्या माहितीच्या आधारे, टीमने अली खान तुगलक आणि इतर आरोपींचा शोध घेतला. अखेर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा

एकूण १० जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी अली खान तुगलक याच्यासह सात जणांना अंबत्तूर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. झिदान झुबीनच्या फोनमधून धक्कादायक बाबी आढळल्या आहेत. त्याच्या फोनमधून कथित ड्रग पेमेंटसाठी पेमेंट करण्यात आले होते. तसेच त्याच्या फोनमुळेच या गँगमधील इतर सदस्यांची नावं उघड झाली.

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

ही गँग आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मन्नाडी येथील मोहम्मद व जयमुजीन यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोघे कट्टनकुलथूर येथील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्जसाठी टार्गेट करत होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर हे सगळं प्रकरण उलगडत गेलं. सध्या अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, त्याचा शोध ते घेत आहेत.

रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

त्रिशाबद्दलच्या वक्तव्यामुळे वादात अडकला होता मन्सूर अली खान

त्रिशा व मन्सूरने विजय थलपतीच्या लिओ चित्रपटात काम केलं होतं, पण त्यांचे एकत्र सीन नव्हते, यावरून मन्सूरने पत्रकार परिषदेत एक विधान केलं होतं. “जेव्हा मी त्रिशाबरोबर काम करतोय, असं ऐकलं तेव्हा मला वाटलं की चित्रपटात बेडरूमचा सीन असेल. मला वाटलं मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसे मी माझ्या आधीच्या चित्रपटात इतर हिरोईनबरोबर केले होते. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही. पण या लोकांनी मला काश्मीर शेड्यूलमध्ये त्रिशाला पाहूही दिले नाही,” असं तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याचा त्रिशाने निषेध केला होता. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानंतर मन्सूर अली खानने त्रिशाची माफी मागितली होती.

Story img Loader