‘कुसुम’ फेम अभिनेता अनुज सक्सेनाला अटक; १४१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

मुंबई पोलिसांनी केली कारवाई

anuj-saxena-actor
(संग्रहित)
‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाने (ईओडब्ल्यू) ही कारवाई केलीय. गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्यच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलीय. कंपनीच्या एका गुंतवणूकदारानेच ही तक्रार केलीय. २०१२ सालात अनुजने गुतवणूकीचा मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप ते न मिळाल्याने त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली.

ईओडब्ल्यूने अनुजची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनुजने या याचिकेचा विरोध केला आहे. तो म्हणालाय की तो एक मेडिकल प्रॅक्टिशनर असून सध्या त्याच्या कंपनीत पीपीई किट आणि सॅनिटायझरची निर्मिती केली जातेय. सध्याच्या महामारीच्या काळात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी असं तो म्हणाला आहे.

न्यायाधिश अभिजीत नांदगावकर यांनी , अनुज जरी एक चिकित्सक असला आणि त्याची कंपनी सध्याच्या काळात महत्वाचे असलेले पीपीई किट तयार करत असली, तरी त्याने गुतवणूरदारांची फसवणूक केलीय. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही असं म्हणत सोमवारपर्यंत अनुजला ईओडब्ल्यूनेच्या ताब्यात देण्यात आलंय.

वाचा : “आपल्यातही असे राक्षस आहेत”; पोस्ट शेअर करत आर माधवनने नेटकऱ्यांना केलं सावध

एकता कपूरच्या ‘कुसुम’ या मालिकेतून अनुज सक्सेनाने टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री केली होती. या मालिकेत त्याने अभय कपूरची भूमिका साकारली होती. कुमकुम, कुछ पल साथ तुम्हारा, सारा आकाश या मालिकांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Famous television actor anuj saxsena arrested duping investors for 141 crore kpw