बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या लांबलचक डायलॉगसाठी विशेष ओळखला जातो. त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटात पाच मिनिटांचा डायलॉग (मोनोलॉग) सलग बोलून दाखवला होता. त्यानंतर त्याने अनेक तरुणींच्या मनावर राज्य केलं. पण आता त्याचा हा रेकॉर्ड रामायणाती लक्ष्मणाने मोडल्याचे म्हटले जात आहे.

सध्या दूरदर्शन वाहिनीवर उत्तर रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहे. या मालिकेत नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये लक्ष्मण माँ सीतेची बाजू घेताना रागात डायलॉग (मोनोलॉग) बोलताना दिसला आहे. हा मोनोलॉग लक्ष्मण आणि श्री राम यांच्यात सुरु असलेल्या संभाषणा दरम्यानचा आहे. उत्तर रामायणातील या भागानंतर सोशल मीडियावर लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी आणि कार्तिक आर्यन यांची तुलना करण्यात केली. कार्तिक आर्यनपेक्षा सुनील लहरी यांचा मोनोलॉग हिट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : उत्तर रामायणातील त्या भूमिकेबद्दल मराठमोळ्या अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…

लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांना जुन्या मालिका पुन्हा पहायला मिळत आहेत. ८० आणि ९०च्या दशकातील जवळपास सर्वच मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आल्या. त्यातील रामनंद सागर आणि बीआर चोपडा यांच्या ‘रामायण’, ‘महाभार’त मालिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता दूरदर्शन वाहिनी आणखी दोन पौराणिक मालिका पुन्हा दाखवत आहे. या मालिकांमध्ये ‘लव कुश’ आणि ‘श्रीकृष्ण’ या मालिकांचा समावेश आहे. या दोन्ही मालिका ९०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक होत्या. ‘लव कुश’ ही मालिका ‘उत्तर रामायण’ म्हणून ओळखली जाते. ही मालिका १९ एप्रिल पासून रात्री ९ वाजता पुन्हा प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे.