शाहरुखचा ‘फॅन’ का पाहाल याची पाच कारणे..

या दोघींनाही ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले नव्हते.

बॉलीवूडचा बादशाहा शाहरुख खान याची दुहेरी भूमिका असलेला ‘फॅन’ चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट का पाहाल याची पाच कारणे पुढीलप्रमाणे:
१. शाहरुखची दुहेरी भूमिकाः शाहरुखच्या चाहत्यांना डबल मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे. विशेष म्हणजे यात शाहरुखची दुहेरी भूमिका असली तरी त्याचे दुसरे रुप हे अगदी वेगळे आहे. यात शाहरुख ओळखताही येत नाही. त्याचा आवाज, शरीरयष्टी या सगळ्या गोष्टींसाठी शाहरुखने बरीच मेहनत घेतलेली दिसते. यात त्याने २५ वर्षीय ‘गौरव’ आणि ५० वर्षीय सुपरस्टार ‘आर्यन खन्ना’ या भूमिका साकारल्या आहेत.
२. शाहरुख द सुपरस्टारः शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात कसा जगतो आणि त्याच्या राहणीमानाचे स्निकपिक फॅनमध्ये दाखविण्यात आले आहे.
३. नो रोमान्सः शाहरुखला रोमान्सचा बादशाहा म्हणून ओळखले जाते. पण त्याला स्वतःलाही अशा चित्रपटांचा कंटाळा आलेला दिसतोय. यशराजच्या इतर चित्रपटांप्रमाणे यात रोमान्सचा अजिबात भरणा करण्यात आलेला नाही. या चित्रपटाद्वारे यशराजने एक वेगळा प्रयत्न केलेला दिसतो.
४. दोन नव्या अभिनेत्रीः या चित्रपटाद्वारे दोन नव्या अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रसिद्ध मॉडेल वलुशा डिसुझा आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया या चित्रपटात झळकणार आहे. या दोघींनाही ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले नव्हते. या दोघींच्याही भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
५. एसआरके आणि वायआरएफः शाहरुख खान आणि यशराज फिल्म्स यांनी एकत्रितपणे बॉलीवूडला नेहमीच हिट चित्रपट दिले आहेत. या दोघांचाही एकमेकांच्या यशात मोलाचा वाटा आहे. ‘फॅन’द्वारे शाहरुख आणि यशराज पुन्हा एकदा बॉलीवूडला हिट चित्रपट देतील यात शंका नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fan releases today five reasons to watch the srk film