बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा बहुचर्चित ‘फॅन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एका चाहत्याची(फॅन) आपल्या सुपरस्टारला भेटण्यासाठीची धडपड आणि भेट झाल्यानंतर समोर येणाऱया वास्तवातून कथेला मिळणारे थरारक वळण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. नुकतेच या चित्रपटातील ‘जबरा’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. हे गाणे विविध भाषांमध्ये डब करून प्रमोशनचा नवा फंडा देखील शाहरुखने यंदा आजमवला. ‘जबरा’ गाण्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सिनेरसिक ‘फॅन’च्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर ‘फॅन’च्या ट्विटर हॅण्डलवरून ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत असून, ‘फॅन’च्या भूमिकेत शाहरुख कमी वयाचा दाखविण्यात आला आहे. या ‘फॅन’च्या भूमिकेतून शाहरुखचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. शाहरुख चित्रपटात आर्यन खन्ना नावाची एका सुपरस्टारची भूमिका साकारत असून, त्याचा चाहता दाखविण्यात आलेला गौरव देखील शाहरुखनेच साकारला आहे.

ट्रेलर-