‘फँड्री’च्या शालूचा पावरी मूड, सोशल मीडियावर राजेश्वररीचा धुमाकूळ

गोल्डमॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

फँण्ड्री फेम राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतेय. राजेश्वरीचे रोज नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. ग्लॅमरस फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत राजेश्वरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेदेखील तुफान लाईकस् देत आहेत.

सोशल मीडियावर अलिकडे ‘पावरी’चा ट्रेंड पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टीव असणारी राजेश्वरी या ट्रेंडमध्ये सामील होण्यापासून स्वत:ला रोखू शकलेली नाही. राजेश्वरी खरातनेदेखील ‘पावरी’चा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘या ट्रेंडसाठी थोडा उशिरच झाला..पण हे जबरदस्त आहे’ असं कॅप्शन देत राजेश्वरीने धमाल करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.

एका सोनेरी रंगाच्या ऑडी कारसोबत राजेश्वरीने हा व्हिडीओ केलाय. “ये हमारी कार है..ये हम है..और हमारी पावरी हो रही है” असं म्हणत राजेश्वरीने व्हिडीओ शेअर केलाय. एका इव्हेंटनंतरचा हा व्हिडीओ असल्याचं लक्षात येतंय. तर राजेश्वरीने घातलेल्या काळ्या पार्टीवेअर ड्रेसवरुनही ती पूर्ण पार्टी मूडमध्ये असल्याचं दिसतंय.

या व्हिडीओत सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते राजेश्वरी सोबत असलेल्या एका गोल्डमॅनने. हा गोल्डमॅन कोण असा प्रश्न अनेकांना पडला. तर व्हिडीओतील गोल्डमॅनचं नाव आकाश मालव असून तो पुण्यातील एक व्यावसायिक आहे. तसचं कलाकारांच्या वेगवेगळ्या सोहळ्यांचं आयोजनही तो करतो.

गेल्या काही दिवसांपासून राजेश्वर सोशल मीडियावर चांगलीच आहे. राजेश्वरीने फोटोशूट केलं असून त्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिची वेगवेगळे लूक्स पाहायला मिळतायत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fandary fame rajeshwari kharat post pawari video with goldman kpw