अक्षय कुमार की आशुतोष राणा?, कोणाची बोंब ऐकून वाटते भिती?; नेटकऱ्यांमध्ये पडले दोन गट

‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरनंतर चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चित्रपटाबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र या ट्रेलरमधील सर्वाधिक चर्चा आहे ती अक्षयने केलेल्या एका नक्कलीची.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ३ मिनिटे ४० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. तो गर्लफ्रेंड कियारा अडवाणीच्या कुटुंबीयांना भेटायला आलेला असतो. पण तेथे आल्यानंतर एक ट्रान्सजेंडर भूत अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवतो. त्यानंतर अक्षयचे वागणे बोलणे पूर्णपणे बदलले असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. याच ट्रेलरमधील एका दृष्यात अक्षय तोंडासमोर हात ठेऊन बोंब मारताना दिसत आहे. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या संघर्ष या चित्रपटामध्येही अशाच प्रकारचे एक दृष्य आहे. संघर्षमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या आशुतोष राणानेही या चित्रपटाच्या एका दृष्यामध्ये बोंब मारल्याचे दृष्य आहे. आता ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर समोर आल्यानंतर अक्षयनेच प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारलेल्या संघर्षमधील आशुतोषचा सीन हा अधिक उत्तम की सध्याचा लक्ष्मी बॉम्बमधील सीन उत्तम यावरुन नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. मात्र अक्षयचे काही कट्टर समर्थक वगळता सर्वांनीच अक्षयला तुझ्यापेक्षा आशुतोषने हा सीन योग्य पद्धतीने केल्याचे म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवरील डाइट सभ्या या अकाऊंटवरुन ही दोन्ही दृष्य एकाच व्हिडीओत पोस्ट करत अक्षयने अशुतोषची नक्कल केल्याचे संकेत दिले.

 

View this post on Instagram

 

Not trying to start anything, but THOUGHTS????

A post shared by Diet Sabya (@dietsabya) on

ट्विटरवरही अनेकांनी प्रतिक्रिया देताना अशुतोषने हा सीन उत्तम साकरल्याचे म्हटले आहे.

१)अशुतोषने उत्तम काम केलेलं

२) सीन काय कपडेही

३) अपेक्षा आहे की

४)असा बनवला पिक्चर

५) नक्कल

६) अशुतोषने ही भूमिका छान साकारली असती

७)चांगला आहे पण

८) फरक आहे म्हणे

९) तुलना केल्यास

१०) अशुतोषची आठवण आली

११) वाट पाहतोय

अशुतोषने हा सीन उत्तम केलाय की अक्षयने याबद्दल तुम्हाला हे सर्व वाचून नक्की काय वाटलं ते कमेंट करुन नक्की कळवा. दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशात काही ठराविक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fans notice ashutosh rana scream rip off in akshay kumar laxmi bomb see reactions scsg