लक्ष्मी पूजा करण्यावरून ट्रोल करणाऱ्यावर फरहान अख्तर करणार कायदेशीर कारवाई

या आधी सुद्धा हिंदू सण साजरी केल्यामुळे फरहानला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

farhan akhtar, farhan akhtar troll,
या आधी सुद्धा हिंदू सण साजरी केल्यामुळे फरहानला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. फरहान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्यामुळे फरहानला बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच दिवाळी निमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा फरहानला ट्रोल करण्यात आले आहे. मात्र, यावेळी फरहान या ट्रोल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई घेणार आहे.

फरहानने ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लक्ष्मी पूजनाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये फरहान त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरच्या कपाळावर टिळक लावत आहे. तर त्याच्या कुटुंबातील काही सदस्य त्या फोटोत दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या फोटोवर काही नेटकऱ्यांनी फरहान आणि त्याच्या कुटुंबाची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

आणखी वाचा : आयकर विभागाने धाड टाकली तेव्हा प्रियंकाच्या घरात टॉवेल गुंडाळून फिरत होता ‘हा’ अभिनेता

या ट्रोलिंगला पाहता जावेद अख्तर म्हणाले, ती या द्वेषाने भरलेल्या कमेंटकडे दुर्लेक्ष करणे म्हणजे या ट्रोर्ल्सला खेळायला एक खेळणे देणे. त्यांच कुटुंब सहसा अशा ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही, पण आता ट्रोलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. याच कारणामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, अख्तर कुटुंब सर्व देवांच्या एकतेवर विश्वास ठेवतात आणि ट्रोल्सला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फरहान अख्तरचे वडील मुस्लीम आणि आई पारशी असल्याने तो ईदप्रमाणेच दिवाळी साजरी करतो.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

फरहान ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. जी ले जरा या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी फरहानचा ‘तूफान’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farhan akhtar brutally trolled for participating in diwali puja despite being a muslim his family to take a legal action dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या