फरहान अख्तरच्या ‘तूफान’चं रोमॅण्टिक पोस्टर रिलीज; या दिवशी येणार ट्रेलर

‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ वर ‘तूफान’चा तूफानी ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार.

farhan-akhtar-toofan-poster-release
(Photo: Instagram@faroutakhtar)

अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ‘तूफान’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. काही वेळापूर्वीच या चित्रपटाचं रोमॅण्टिक पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमधून त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची देखील घोषणा केलीय. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. मात्र, करोना परिस्थितीमुळे आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतलाय.

अभिनेता फरहान अख्तर याने स्वतःच्या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बहूप्रतिक्षित ‘तूफान’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. दोन्ही पोस्टरमध्ये अभिनेता फरहानचे दोन वेगवेगळे लूक पहायला मिळतात. पहिल्या रोमॅण्टिक पोस्टरमध्ये फरहानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर दिसून येत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये फरहान बॉक्सिंग करताना दिसून येत आहे. हे दोन्ही पोस्टर शेअर करताना फरहानने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “आयुष्य तुम्हाला तोपर्यंत खचू देत नाही जोपर्यंत तुम्ही प्रेमाने बांधलेले असता…३० जून रोजी ट्रेलर आऊट होतोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

त्यामुळे ‘तूफान’साठी चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘तूफान’चा तूफानी ट्रेलर 30 जूनला प्रदर्शित होणार असून येते दोन दिवस चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी उत्साहाचे असणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांच्याद्वारे करण्यात आली आहे. ‘तूफान’चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकुर व परेश रावल यांच्या देखील भूमिका आहेत.

‘तूफान’ भारतासह 240 देश व प्रदेशांमध्ये 16 जुलै ला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farhan akhtar film toofaan trailer will release on thirty june prp

ताज्या बातम्या