गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलचं नाव इतकं चर्चेत आहे की ते घरोघरी पोहोचलं आहे. आपल्या डान्समुळे विवादात अडकलेली व कायम चर्चेत असलेली गौतमी पाटील हिच्याशी संबंधित काही खुलासे तिच्या वडिलांनी केले आहेत. गौतमी पाटीलचे वडील रविंद्र नेमपगारे पाटील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी गौतमीचा डान्स, तिच्या आडनावावरून होणारा वाद यासंदर्भात एका मुलाखतीत भाष्य केलं. गौतमीच्या डान्सवर अनेकदा टीका केली जाते, या टीका करणाऱ्यांनाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं, तसेच गौतमीच्या जन्म नावाचा खुलासाही केला.

“ती काही…”, गौतमी पाटीलच्या डान्सवर टीका करणाऱ्यांना तिच्या वडिलांनी थेट सुनावलं

shirur lok sabha latest marathi news
“अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’पणा ठासून भरला आहे म्हणूनच…”, शिवाजी आढळराव पाटील यांचे अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
mithun chakraborty son namashi calls him mithun
मिथुन चक्रवर्तींना नावाने हाक मारतात त्यांची मुलं, कारण सांगत लेक नमाशी म्हणाला, “आम्ही वडिलांना…”
Raj Thackeray Padawa Melava
MNS Gudi Padwa Melava : अमित शाहांच्या भेटीत काय ठरलं? राज ठाकरेंनी शिवतीर्थवरून सांगितला घटनाक्रम, म्हणाले….

गौतमी पाटीलवर सातत्याने टीका होते, त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मुलीला सल्ला दिला. लोक बोलतच राहतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, असं वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील म्हणाले. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी मुलीच्या जन्म नावाबद्दल खुलासा केले. गौतमीचं जन्म नाव वैष्णवी पाटील होतं, पण तिला शाळेत टाकताना नाव बदलून गौतमी ठेवलं होतं, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा – गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर, लेकीच्या आडनावाच्या वादावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, गौतमीचे वडील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावात राहतात. तिथेच ते शेती करतात. गौतमी ७-८ वर्षांची असताना ते पत्नीपासून विभक्त झाले. गौतमी व तिची आई त्यांच्या मामाकडे राहत होत्या. घर सोडलं तेव्हापासून त्यांची भेट नाही. आता जवळपास दोन दशकांचा काळ उलटून गेला आहे, असंही ते म्हणाले. आता गौतमीने नाव कमावलेलं पाहून मुलीचा अभिमान आहे. गौतमी काहीच वाईट करत नाहीये, असं म्हणत त्यांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे.