‘फोटोग्राफर आमिर खान असेल’, बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल

फातिमाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

fatima sana shaikh, aamir khan
आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर फातिमाने पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री फातिमा सना शेख ही काही दिवसांपूर्वी आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. फातिमा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फातिमा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच फातिमाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फातिमाने निळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या फोटोंमध्ये फातिमा बोल्ड अंदाजात दिसत आहे. फातिमाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

मात्र, काही नेटकऱ्यांनी फातिमाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आमिरचे पूर्ण लक्ष हे तुझ्यावर आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हिला कोणीतरी तुरुंगातून बाहेर काढा एवढ्या सुंदर महिलेला इतका त्रास का देतात.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठी खुले आहेत.’

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

fatima sana shaikh, aamir khan
फातिमाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

दरम्यान, ‘दंगल’ या चित्रपटातून फातिमाला खरी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात फातिमाने गीता फोगाटची भूमिका साकारली होती. ‘दंगल’ चित्रपटात आमिर आणि फातिमा यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर फातिमाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपूर्वी फातिमाचा ‘लुडो’, ‘सूरज पे मंगल भारी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fatima sana shaikh bold photo went viral netizen says the photographer is aamir khan dcp