जेव्हा शाहरुख खानमुळे फातिमा सना शेखने दिवसभर धुतले नाही हात; काय आहे किस्सा?

काय घडलं होतं ‘त्या’ पार्टीत?

fatima-sana-shekh-shaharukh-khan

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे केवळ देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ असतात. एवढचं नव्हे तर बॉलिवूडमध्ये अभिनय करणारे अनेक कलाकार शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखसोबत काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे दंगल गर्ल फातिमा सना शेख. खर तरं बालकलाकार म्हणून फातिमाने शाहरुख सोबत काम केलंय. मात्र फातिमा शाहरुखची मोठी चाहती आहे. फातिमाने स्वत: या गोष्टीचा खुसाला केलाय.

फातिमा सना शेखने शाहरूखसोबत ‘वन टू का फोर’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं आहे. मात्र त्यानंतर फातिमा जशी मोठी होत गेली तसं शाहरुखबद्दल तिचं आकर्षण अधित वाढतं गेलं. त्यानंतर एका दिवाळी पार्टीमध्ये फातिमाला शाहरुखला पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबत ती या पार्टीत गेली होती. यावेळी एका जोकवर फातिमाला हसू आवरणं कठीण झालं. ती जोरजोरात हसू लागली आणि चुकून तिच्या हातचा शाहरुखच्या हाताशी स्पर्श झाला. त्यानंतर संपूर्ण दिवसभर फातिमाने हातच धुतला नाही.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत फातिमाने या घटनेचा खुलासा केला. यावेळी फातिमा म्हणाली जर शाहरुखला ही गोष्ट कळाली तर कादाचित ते कधीच माझ्यासोबत काम करणार नाहित. ती म्हणाली, “आमिर खानने आमची शाहरुख खानशी भेट करून दिली. गप्पा सुरू असताना शाहरुखने एक जोक मारला. तेव्हा माझा हात त्याच्या हाताला लागला. मला जोक तर लक्षात नाही. पण मी पूर्ण दिवसभर हात धुतला नव्हता. ” अशी आठवण फातिमाने सांगितली.

फातिमा काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘अजीब दास्तांस’ या सिनेमात झळकली आहे. त्याचसोबत ‘लूडो’ सिनेमातही तिने महत्वाची भूमिका साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fatima sana shekh revels when she meet shaharukh khan and did not wash her hands for whole day kpw

ताज्या बातम्या