‘फिल्स लाइक इश्क’ नेटफ्लिक्सचा नविन उपक्रम सहा लघुकथांची एक सिरिज

बुधवारी नेटफ्लिक्सने फ्लिस लाईक इशक चा ट्रेलर रिलीजल केला. फ्लिस लाइक इशक ही सात छोट्या-छोट्या लव्हस्टोरी आहेत.

feels-like-ishq
(Photo-netflix trailer)

नेटफ्लिक्स बऱ्याचकाळापासून वेगवेगळ्या सीरिजसहं प्रेक्षकांचे मनोरांजन करत आहे. ‘फिल्स लाइक इश्क’ ही नेटफ्लिक्सची नविन वेब सीरिज आहे. या सीरिजच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हा ट्रेलर बुधवारी नेटफ्लिक्सच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. या सीरिजमध्ये सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या सहा वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत.
या सीरिजचे दिग्दर्शन रूचिर अरूण, ताहिर कश्यप खुरान,आनंद तिवारी,दानिश अस्लम,जयदीप सरकार,सचिन कुंडालकर आणि देवरथ सागर यांनी केले आहे.

ही सीरिज तुम्हाला प्रेमाची नविन परिभाषा शिकवेल. प्रेम, प्रेमभंग, रिलेशनशिप मधील चढाव उतारसह हास्याचा डोस देणारी ही कथा आहे. तुम्हाला प्रेमात पडण्यासाठी जागेची गरज नाही. तुम्हाला प्रेम कधी ही कुठे ही होऊ शकते. हेच ‘फिल्स लाइक इश्क’ची पहिली गोष्ट ‘सेव द डेट’ सांगते. सेव द डेट या लघुपटात राधिका मदन आणि अमोल पाराशर प्रमुख भूमिकेत दिसतील. तसंच आनंद तिवारी दिग्दर्शीत ‘स्टार होस्ट’ ही प्रेक्षकांना प्रेम काय असते याची खरी ओळख करून देणार आहे. स्टार होस्ट मध्ये रोहित सराफ आणि सिमरन जेहान आदित्य आणि ताराची भूमिका साकारताना दिसतील.

ताहिरा कश्यप खुराना दिग्दर्शत ‘ क्वारंटी क्रश’ ही एक लॉकडाउन मधील प्रेमाची कहाणी आहे. यात लॉकडाउन कपल निम्मी आणि मनिंदरच्या भूमिकेत काजोल चुघ आणि मिहिर आहूजा झळकणार आहेत. आत्मविश्वास, आदर, एका नात्यात किती महत्वाचे आहेत हे सचिन कुंडलकर यांच्या ‘द इंटरव्यू या’ लघुकथेत सांगितले आहे. नीरज माधव आणि ज़ायन खान यांच्या साधेपणामुळे ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. तसंच तुम्ही प्रेमात पडल्यावर सगळं काही सुंदर वाटतं हे जयदीप सरकार यांनी त्यांच्या ‘इश्क मस्ताना’ या कथेतून सांगितले आहे. आणि सहावी लघुकथा ही दानिश असल्म दिग्दर्शित ‘शी लव्स मी,लव्स मी नॉट’ आहे. ही कहाणी ‘समलैंगिक संबंधांनवर’ प्रकाश टाकणारी आहे. ‘फिल्स लाइक इश्क’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर ‘२३ जुलै’ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांचे खास करुन तरुणवर्गाचे लक्ष वेधून घेणारा आहे. ‘फिल्स लाइक इश्क’ या सीरिजमध्ये राधिका मदान, अमोल पाराशर, काजल चुघ, मिहिर आहूजा, सिमरन जेहानी, रोहित सराफ, सबा आजाद, संजीता भट्टाचार्या, जायन खान, नीरज माधव, तान्या मनिकताला आणि स्कंद ठाकूर प्रमुख भूमिका साकारताना दिसतील.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Feels like ishq trailer out six amazing stories