इटालियन चित्रपटांचा महोत्सव २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान रीगल सिनेमागृहात पाहण्याची संधी मुंबईकर सिनेमा रसिकांना मिळणार आहे. ‘सिनेमा इटालियन स्टाईल’ असे आकर्षक नाव असलेल्या या महोत्सवाचे आयोजन फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि इटालियन कल्चरल इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई या संस्थांनी केले असून शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांची संकल्पना आहे. यात इटालियन सिनेमासृष्टीतील महान दिग्दर्शक व्हिट्टोरिओ डिसिका, फेडरिको फेलिनी तसेच लुचिनो व्हिस्कोन्टी आणि मुख्यत्वे ज्युसेप्पे टोर्नाटोर यांचे निरनिराळ्या काळात प्रदर्शित झालेले चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

इटालियन चित्रपटांना पुन्हा एकदा जगभरातील चित्रपट समीक्षकांची मान्यता मिळवून देणारे दिग्दर्शक अशी ओळख असलेले ज्युसेप्पे टोर्नाटोरे यांचे ‘सिनेमा पॅराडिसो’ (१९८८), ‘एनीओ’ (२०२१), ‘मलेना’ (२०००) असे तीन चित्रपट पाहायला मिळतील. एवढेच नव्हे तर या दिग्दर्शकाशी सिनेमाच्या विद्यार्थ्यांना गप्पा करण्याची संधी तसेच त्यांची मुलाखत ऐकण्या-पाहण्याची संधीही या महोत्सवात मिळणार आहे. ‘सिनेमा पॅराडिसो’ या सिनेमाला त्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचे ऑस्कर पारितोषिक मिळाले होते.

new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…
Loksatta viva Bollywood faces of International brands Brands actress
विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…
thangalaan buchingham murders agent ott release novembar
थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट

हेही वाचा >>>भाऊचा धक्का नव्हे तर…; या आठवड्यात रितेश देशमुख घेणार नाही सदस्यांची शाळा, काय आहे कारण?

इटालियन नववास्तववादी सिनेमा चळवळीतील दिग्दर्शक व्हिट्टोरिओ डिसिका, लुचिनो व्हिस्कोन्टी, फेडरिको फेलिनी यांच्या ‘ला डॉल्से व्हिटा’ (१९६०) या चित्रपटाला कान महोत्सवात त्यावर्षी ‘पाम डी ओर’ हा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार मिळाला होता. सिनेमा जगतातील स्पाघेटी वेस्टर्न या शैलीचे उद्गाते मानले जाणाऱ्या सर्जिओ लेओने या दिग्दर्शकाचा ‘वन्स अपॉन ए टाईम इन अमेरिका’ (१९८४) हा सिनेमाही या महोत्सवात दाखवला जाणार आहे.

‘सिनेमा पॅराडिसो’ या प्रचंड गाजलेल्या सिनेमाने महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. शनिवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘एनीओ’, सायंकाळी ७ वाजता ‘मलेना’ आणि रात्री ९.३० वाजता ‘मॅरेज इटालियन स्टाइल’ या चित्रपटाचे खेळ होणार आहेत. रविवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ‘सेन्सो’, दुपारी ३ वाजता ‘ला डॉल्से व्हिटा’ आणि सायंकाळी ६.३० वाजता ‘वन्स अपॉन ए टाइम इन अमेरिका’ या चित्रपटांचे खेळ होणार आहेत.

महोत्सवासाठी शुल्क आकारले जाणार नसून https://tinyurl.com/udhw3k9s यावर नोंदणी करून महोत्सवात रसिकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी दिली.