बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात; कमल हसन, उर्मिला यांच्यानंतर आता तनिषा करोना पॉझिटिव्ह

तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी करोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. नुकतंच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे चित्र समोर आले होते. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलची धाकटी बहिण तनिषा मुखर्जी हिला करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काजोलप्रमाणे तनिषाही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तनिषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक मेसेज शेअर केला आहे. या तनिषाने म्हटले की, सर्वांना नमस्कार, मला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मला विलगीकरणात राहावे लागणार आहे, असे तिने यात सांगितले आहे. तनिषाने ही अशा काही कलाकारांपैकी आहे, ज्यांनी करोना काळातही काम केले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ती लखनऊमध्ये एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केलं होतं. तनिषाच्या आधी उर्मिला मातोंडकर आणि दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनाही करोनाची लागण झाली.

हेही वाचा : एकट्या ऐश्वर्याने ३० लोकांना वाढले होते जेवण, विशाल दादलानीने सांगितला किस्सा

तनिषाने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर ती ‘निल अँड निक्की’, ‘सरकार’, ‘सरकार राज’ आणि ‘टँगो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली होती. सध्या, तनिषा तिच्या आगामी ‘कोड नेम अब्दुल’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यात ती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Film actress kajol sister tanisha mukherjee tested corona positive nrp

Next Story
‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकाराने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी