मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संघटना असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’ची पंचवार्षकि निवडणूक लवकरच होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाचा कारभार आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या ‘उद्योगां’विषयी प्रसार माध्यमातून चर्चा, वाद सुरु आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. चित्रपट महामंडळाचा गेल्या काही वर्षांतील कारभार पाहता महामंडळाची ही निवडणूक म्हणजे पंचवार्षकि ‘आखाडा’ ठरणार आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सहा जणांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची बठक होऊन त्यात निवणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडुकीत जागृती, समर्थ, श्री महालक्ष्मी या तीन पॅनेलचे सदस्य निवडणुकीच्या िरगणात होते. महामंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि चित्रपटाशी संबंधित अशी जवळपो २ हजारांहून अधिक मंडळी चित्रपट महामंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजाविला होता.
चित्रपट व्यवसायाशी निगडित विविध १४ विभागांसाठीच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी ही पंचवार्षकि निवडणूक होत असते. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत ‘जागृती पॅनल’मध्ये निर्माता विजय कोंडके, दिग्दर्शक पितांबर काळे, लेखक सुभाष भुरके, अभिनेता विजय पाटकर, अभिनेत्री-निर्माती अलका कुबल, संकलक संजीव नाईक, नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार, वितरक प्रसाद सुर्वे यांचा समावेश होता.
समर्थ पॅनेलमध्ये सुशांत शेलार, सतीश रणदिवे, भालचंद्र कुलकर्णी, किशोरी शहाणे यांचा तर श्री महालक्ष्मी पॅनेलमध्ये विजयलक्ष्मी िशदे, अनिता काशीकर, जयसिंग माने, प्रमोद िशदे, भास्कर जाधव, बाबासाहेब पाटील, सुरेखा कुडची आदींचा समावेश होता. शिवाय तेरा अपक्षांनीही निवडणूक लढविली होती.
आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या कार्यकाळात विजय कोंडके, प्रसाद सुर्वे आणि आता विजय पाटकर यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या सगळ्यांच्याच कार्यकाळात अध्यक्ष आणि महामंडळाच्या एकूण कारभाराविषयी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दावे व प्रतिदावे केले गेले. महामंडळाच्या बठकीत हाणामाऱ्या, हमरीतुमरीवर येण्याचे प्रकारही घडले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मंडळाची मुंबई कृती समिती यांच्यातील वादाचे पडसादही काही महिन्यांपूर्वी उमटले.
मुंबई कृती समितीतील सदस्यांनी चित्रपट महामंडळाच्या प्रभादेवी येथील कार्यालयात जाऊन मुंबई विभागीय समितीचा फलक लावला. या फलकावरून चित्रपट महामंडळातील संचालक आणि कृती समितीच्या सदस्यांत कुरबुरी झाल्या. चित्रपटसृष्टीशी संबंधित समस्या सोडविण्यापेक्षा परस्परांमधील मतभेद आणि त्यातून होणारया आरोप-प्रत्यारोपांनीच महामंडळ चच्रेत आहे. गेल्या पाच वर्षांत महामंडळामध्ये सातत्याने वाद झाले. विद्यमान संचालक मंडळातील वादविवादांमुळे गेल्या निवडणुकीमध्ये जी पॅनेल्स व मंडळी होती त्यांच्यातही यंदा मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे. काही नवी समीकरणे तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.