‘फिल्म फेस्टीव्हल्स’ हे तरुण दिग्दर्शकांना आपले विचार मांडण्याची संधी निर्माण करून देतात, असे मत बॉलीवूड अभिनेते आणि मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केले. नव्या दमाच्या नवविचारी तरुण पीढीला आपले मनातले सांगणे लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर मांडता येते. हल्ली मोबाईलच्या कॅमेरातूनही विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर लघुपट साकारतात, ही वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे जॅकी श्रॉफ म्हणाले.
‘मुंबई फिल्म फेस्टीव्हल’ला आपण ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नाही, तर एक विद्यार्थी म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही ते पुढे म्हणाले. या फेस्टीव्हलच्या माध्यमातून मला लघुपट, माहितीपटांचा नव्याने अभ्यास करता येणार असल्याची भावना श्रॉफ यांनी व्यक्त केली.