अभिनेत्री कविता कौशिक दिसणार बिग बॉस १४मध्ये?

३ ऑक्टोबर पासून बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. लवकरच बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण शोमध्ये कोणते कलाकारा सहभागी होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आता FIR मालिकेत काम करणारी अभिनेत्री कविता कौशिक बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानची जवळची मैत्रीण अभिनेत्री कविता कौशिकने बिग बॉस १४मध्ये सहभागी होण्यास होकार दिला आहे. ती लवकरच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार असून मेडिकल टेस्ट करुन घेणार असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा : असं असणार बिग बॉस १४चं घर? फोटो व्हायरल

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४मध्ये नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘बिग बॉस १४’ ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fir actress kavita kaushik to participate in salman khan bigg boss 14 avb

ताज्या बातम्या