scorecardresearch

‘त्याने २ वेळा जबरदस्तीने मला गर्भपात…’, गायकाविरुद्ध महिलेने केली तक्रार

गायका विरोधात आयपीसी कलम ४२० ४०६ ३१३ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Jain singer and composer, FIR Against Rahul Jain For Child Abandon, bollywood news,

गायक आणि कंपोजर राहुल जैन विरोधात एका महिला लेखिकेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्या महिलेने राहुलवर मुलाला सोडून गेल्याचा आरोप केला आहे. तसेच त्या महिलेला दोन वेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यास सांगितल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. राहुल विरोधात आयपीसी कलम ४२० ४०६ ३१३ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राहुलवर जबरदस्तीने गर्भात करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. ‘जर आमच्या नात्याविषयी आणि मुलांविषयी सर्वांना कळाले तर करिअर खराब होईल असे तो मला म्हणाला.’ दरम्यान, मुलाच्या जन्म दाखल्यावर त्याच्या वडिलांचे नाव आहे. पण मुलाला आपले नाव देणे तर सोडा त्याने बाळाच्या आईला देखील सोडून दिले आहे. सध्या तो बेपत्ता आहे, असे पीडितेच्या वकीलांनी सांगितले.

राहुल जैनने दोन वेळा महिलेला गर्भपात करण्यास सांगितले. तसेच महिलेचे पैसे देखील वापरले. इतकंच नाही तर त्या महिलेने लिहिलेले गाणे देखील राहुलने वापरले आणि स्वत:च्या नावावर काही म्यूझिक कंपन्यांना हक्क विकले. राहुलने त्या महिलेला तिच्या गाण्याचे पैसे देखील दिले नाहीत, असा आरोपही तिने केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 18:37 IST

संबंधित बातम्या