‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये असलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो आणि त्यात असलेले कलाकार नेहमीच चर्चेत असतात. मात्र, या वेळी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृष्यावरून शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोमध्ये एका एपिसोडमध्ये काही कलाकार दारू पित अभिनय करत असल्याचं समोर आल आहे. प्रत्येक बाटलीवर ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे,’ असे लिहिलेले असताना देखील काही कलाकारांनी सेटवर मद्यपान केल्यामुळे त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा : करीनाने शेअर केला बिकिनीमधील मिरर सेल्फी; कॅप्शनमध्ये म्हणाली, “चला उन्हाळा…”

शिवपुरी येथील वकिलांनी सीजेएम न्यायालयात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. “सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा’ शो नीट नाही. शोमध्ये मुलींवर देखील अश्लील कमेन्ट करण्यात येतात. एकदा शोमध्ये बेकायदा कोर्ट तयार करण्यात आलं आणि त्याठिकाणी काही कलाकारांनी दारू पिऊन अभिनय केला. हा कायदा आणि न्यायालयाचा अपमान आहे. म्हणूनच मी कोर्टात कलम ३५६/३ अंतर्गत दोषींवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. ढिसाळपणाचे असे प्रदर्शन थांबवले पाहिजे,” असे त्या वकिलांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

त्यामुळे याप्रकरणी काय निकाल लागणार आणि ‘द कपिल शर्मा’ शो समोर आता काय संकट येणार याकडे सगळ्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अर्जामध्ये सांगितल्याप्रमाणे १९ जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये हे दाखवण्यात आले आहे. या एपिसोडचा रिपीट टेलीकास्ट हा २४ एप्रिल २०२१ रोजी दाखवण्यात आला. वकिलांचा दावा आहे की, शोमध्ये एका पात्राला न्यायालयाचा सेट बनवून दारूच्या प्रभावाखाली वागताना दाखवण्यात आले. यामुळे न्यायालयाची बदनामी झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against the kapil sharma show for showing actors drinking alcohol in courtroom set dcp
First published on: 24-09-2021 at 13:30 IST