‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘स्पायडरमॅन’ इत्यादी अनेक सुपरहिरो प्रकारातील चित्रपट हॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. या चित्रपटांनी जगभरात लोकप्रियता मिळवली. त्या मानाने बॉलिवूडमध्ये सुपरहिरो प्रकारातील चित्रपटांचे प्रमाण फार नगण्य आहे. ‘क्रिश’ चित्रपटात हृतिक रोशनने साकारलेल्या सुपरहिरोला चांगले यश मिळाले, तर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानच्या ‘रा वन’ चित्रपटातील सुपरहिरोचे हसे झाले. नव्या दमाचा अॅक्शन हिरो आणि जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ ‘अ फ्लाईंग जाट’ या आगामी चित्रपटात सुपरहिरो साकारताना दृष्टीस पडणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले असून, डोळ्यावर मास्क आणि सुपरहिरोचा पोशाख परिधान केलेला टायगर श्रॉफ पॉस्टरवर पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेमो डिसुझाच्या या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस टायगरची हिरोईन आहे. बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात झळकणार आहे. नाथन जोन्स नावाचा अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत असून, चित्रपटाच्या अन्य एका पोस्टरमध्ये त्याचे दर्शन होते. ‘हॉप हॅज अ न्यू नेम’ असे शीर्षक असलेले टायगरचे पोस्टर पाहून चित्रपटाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First look of tiger shroff as desi superhero in a flying jatt
First published on: 27-10-2015 at 12:55 IST