अहमद शाह अब्दालीच्या रुपातला संजय दत्तचा भेदक लुक पाहिलात का?

आशुतोष गोवारीकर यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हा ऐतिहासिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. मोहेंजेदारो, जोधा अकबर हे त्याचे चित्रपट येऊन गेले. आता पानिपतच्या लढाईवर आशुतोष गोवारीकर सिनेमा आणतो आहे. या सिनेमात संजय दत्त हा अभिनेता अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत आहे. त्याच लुकमधला संजय दत्तचा फोटो आशुतोष गोवारीकरने ट्विट केला आहे. या सिनेमात सदाशिवराव भाऊची भूमिका कोण करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या सिनेमात अर्जुन कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमातला संजय दत्तचा लुक पहिल्यांदाच समोर आला आहे. तसेच उद्या म्हणजेच मंगळवारी या सिनेमाचा ट्रेलरही आऊट होणार आहे.

पानिपतची लढाई ही मराठे हरले असले तरीही ती मराठ्यांची शौर्यगाथा होती. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवरावभाऊ या युद्धात कामी आला. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येतो आहे. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. या सिनेमाचा पहिला ट्रेलर उद्या आऊट होणार आहे. या ट्रेलरवरुन सिनेमात कुणाची कसली भूमिका आहे ते समजू शकतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First look sanjay dutt is intense as ahmad shah abdali scj

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या