कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटातील फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत

ट्विटरवर सध्या ‘विक्रम’ चित्रपट ट्रेंड होताना दिसत आहे.

कमल हासन हे नाव आता कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेले नाही. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा दबदबा असल्याचे पाहायला मिळते. ते बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील तितकेच लोकप्रिय आहेत. काल, ७ नोव्हेंबर रोजी कमल हासन यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम’चा फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘विक्रम’ या चित्रपटात कमल हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक अॅक्शनचा भरणा असलेला चित्रपट आहे. त्यांचा चित्रपटातील लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ आतापर्यंत जवळपास १० मिलियन लोकांनी पाहिला आहे. तसेच ४ लाख पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. ट्विटरवर सध्या विक्रम ट्रेंड होताना दिसत आहे.
आणखी वाचा : …म्हणून कमल हासन यांनी केले होते सारिकाशी लग्न

‘विक्रम’ चित्रपटात मल्याळम सुपरस्टार फहाद फासिल आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण आहे. पण चित्रपटातील फर्स्ट लूक व्हिडीओ पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First look video of kamal haasans upcoming film vikram went viral avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या