जगातील पहिला मराठी हॉलीवूड सिनेमा, शौर्य, धैर्य अन् पराक्रमाची आख्यायिका ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’

हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे

sonalee-kulkarni
(Photo-Instagarm@sonalee18588)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजवर विविध पथडीतील भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. लवकच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय. यासोबतच सोनालीने मराठी प्रेक्षकांना एक मोठी आनंदाची बातमी दिलीय.

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेली ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ ‘ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

“मॅडम रणबीरसोबत चाला…”; आलियाचे भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. अशा या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First marathi hollywood movie sonalee kulkarnis chatrapati tararani kpw

Next Story
गॉसिप