scorecardresearch

Premium

पाहाः ‘हॅपी जर्नी’चा ट्रेलर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘हॅपी जर्नी’ चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पाहाः ‘हॅपी जर्नी’चा ट्रेलर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ‘हॅपी जर्नी’ चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता कलावंत अतुल कुलकर्णी आणि ‘काकस्पर्श’मधील अभिनयाचे कौतुक झालेली अभिनेत्री प्रिया बापट प्रथमच एकत्र आले आहेत. तेही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अतुल आणि प्रियाचे भाऊ-बहिणीमध्ये असलेले अतुट आणि सुंदर नाते पाहावयास मिळते. या दोघांमध्ये नंतर येत असलेले त्यांचे प्रियकर यांचीही झलक पाहावयास मिळते. पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन यांनी अतुल आणि प्रियाच्या प्रियकरांची भूमिका साकारली आहे. हॅप्पी जर्नी’ ची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, पुणे, वेल्हे आणि मांणगाव अशा विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी एक विशेष गाडीही (हाऊस ऑन व्हील्स) तयार करण्यात आली होती आणि ती चालवता यावी यासाठी अतुलने तशी मेहनतही घेतली.  सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘हॅपी जर्नी’ १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First trailer of marathi movie happy journey

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×