रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादूई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजाळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाला मनोरंजनाच्या माध्यमातून एकत्र आणण्याच्या आणि त्यांना नव्या कोऱ्या सिनेमांचा नजराणा सादर करण्याच्या उद्देशाने ‘प्रवाह पिक्चर’ ही नवी वाहिनी सुरू करण्यात आली आहे. ‘डिस्ने स्टार’च्या या नव्या चित्रपट वाहिनीची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. या प्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतले सर्व दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्रवाह पिक्चर’ नावाने येणाऱ्या नव्या वाहिनीवर दर रविवारी नव्या सिनेमाचा वल्र्ड टेलिव्हिजन प्रीमियर करण्यात येणार आहे. मराठी चित्रपट वाहिनीवर असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीच्या माध्यमातून चंदेरी दुनियेचं सोनेरी पर्व खऱ्या अर्थाने सुरू होत आहे. ‘प्रवाह पिक्चर’ या नव्या कोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून प्रवाह ब्रॅण्डचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून मराठी सिनेमा साजरा करण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिनेमांचा आनंद लुटता येईल. दर्जेदार मनोरंजनाच्या शोधात असलेल्या मराठी कुटुंबासाठी ‘प्रवाह पिक्चर’ ही वाहिनी हक्काचं दालन असेल याची आम्हाला खात्री आहे’, अशी भावना नेटवर्क एन्टरटेन्मेन्ट चॅनल्स आणि ‘डिस्ने स्टार’चे प्रमुख केविन वाझ यांनी व्यक्त केली.

‘प्रवाह पिक्चर’ वाहिनीवर चित्रपटांच्या प्रीमियर्सचा शुभारंभ ‘पावनिखड’ या सर्वात मोठय़ा यशस्वी सिनेमापासून सुरू होणार आहे. १९ जूनला हा धमाकेदार सिनेमा वाहिनीवर पाहता येईल. या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित कलाकारांची फौज असलेला ‘झिम्मा’ हा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘प्रवाह पिक्चर’वर पाहता येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘कधी आंबट कधी गोड’ आणि ‘प्रवास’ या दोन सिनेमांचीदेखील ‘प्रवाह पिक्चर’वर खास पर्वणी असेल. सुपरस्टार स्वप्निल जोशीचा ‘बळी’, महेश मांजरेकर यांचा ‘ध्यानीमनी’, समीक्षकांनी गौरवलेला आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला ‘कारखानीसांची वारी’ असे काही चांगले चित्रपट येत्या काही आठवडय़ांत ‘प्रवाह पिक्चर’ वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘प्रवाह पिक्चर’ आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट वल्र्ड टेलिव्हिजन प्रीमियर म्हणून फक्त ‘प्रवाह पिक्चर’वर प्रक्षेपित केले जातील आणि हेच या वाहिनीचं वेगळेपण ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flow picture audience stressful life family cinema medium family memories ysh
First published on: 22-05-2022 at 00:04 IST