Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाला अवघे तीन दिवस बाकी राहिले आहेत. १२ जुलैला अनंत बोहल्यावर चढणार असून राधिका मर्चंटशी लग्नबंधनात अडकणार आहे. संपूर्ण देशभरातचं नव्हे जगभरात अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. काल, ८ जुलैला दोघांचा हळदी समारंभ पार पडला. ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरे यांचा संगीत सोहळ्यातील डान्स व्हिडीओ समोर आला आहे. ५ जुलैला अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. या संगीत सोहळ्यासाठी खास अंबानींनी जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स आयोजित केला होता. यासाठी अंबानींनी ८२ कोटी रुपये मोजले होते. जस्टिनच्या परफॉर्मन्स शिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स केला. सलमान खान अनंत अंबानीबरोबर ‘ऐसा पहिली बार हुआ है’ गाण्यावर डान्स करताना दिसला. तर रणवीर सिंह ‘इश्क दी गली विच नो एन्ट्री’ गाण्यावर थिरकला. या बॉलीवूड सेलिब्रिटींसह डान्स करताना तेजस ठाकरे देखील पाहायला मिळाले. हेही वाचा - Video: धर्मासाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने वर्षभरानंतर लेकाची दाखवली पहिली झलक, पाहा गोंडस तारिक जमीलचा व्हिडीओ अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरेंनी रश्मी ठाकरेंबरोबर हजेरी लावली होती. या संगीत सोहळ्यासाठी तेजस यांनी खास लूक केला होता. शाही निळ्या रंगाचा सिल्कचा कुर्ता तेजस यांनी परिधान केला होता. ज्यावर त्यांनी कुर्त्याला मॅचिंग असा स्टोल घेतला होता. या संगीत सोहळ्यात तेजस अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे, ओरी यांच्याबरोबर डान्स करताना पाहायला मिळाले. सेलिब्रिटी फोटोग्राफर 'विरल भयानी'च्या इन्स्टाग्राम पेजवर तेजस ठाकरेंचा डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, शाहरुख खान व काजोलच्या 'लडकी हाय अल्लाह' या गाण्यावर तेजस ठाकरे थिरकताना दिसत आहेत. सारा, अनन्या, ओरी यांच्या ग्रुप डान्समध्ये तिसऱ्या रांगेत कोपऱ्यात तेजस ठाकरे डान्स करत आहेत. त्यांच्या या डान्स व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेही वाचा - Video: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’, अमृता खानविलकरचा छोट्या पुष्पाबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ दरम्यान, १२ जुलैला शुभ मुहूर्तावर दुपारी ३ वाजता अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.