बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असलेला ‘सिता रामम्’ हा तेलुगू चित्रपट ५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटातूनच मृणालने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. ‘सिता रामम्’ चित्रपटात अभिनेता दुलकर सलमानही प्रमुख भूमिकेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हनु राघवपुडी दिग्दर्शित ‘सिता रामम्’ चित्रपटाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होताना दिसत आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट करत चित्रपट पाहिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “’सिता रामम्’ चित्रपट पाहिला. कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या योग्य समन्वयाने चित्रपटातील काही सीन उत्कृष्टरित्या चित्रित झाले आहेत. एका साध्या लव्हस्टोरीला शूरवीर सैनिकाची पार्श्वभूमी दिली गेली आहे. भावनांची उत्तमरित्या सांगड घालणारा हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असाच आहे”.

हेही वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या वितरकांना आमिर खान नुकसान भरपाई देणार?, सत्य आलं समोर

पुढे त्यांनी ट्वीटमध्ये “बऱ्याच काळानंतर चांगला चित्रपट पाहिल्याचं ‘सिता रामम्’ बघितल्यानंतर मला जाणवलं”, असं म्हटलं आहे. व्यंकय्या नायडूंनी चित्रपटाचे दिग्दर्शक हनु राघवपुडी यांचंही कौतुक केलं आहे. “एकीकडे युद्ध सुरू असताना चित्रपटातील निसर्गाचं सौंदर्य दाखवणारी दृश्ये डोळ्यांना सुखावणारी आहेत. दिग्दर्शक हनु राघवपुडी, निर्माते अश्विनीदत्त आणि स्वप्न मुव्ही मेकर्सचे अभिनंदन”, असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : पाहताक्षणीच पत्नीच्या प्रेमात पडले होते राजू श्रीवास्तव, १२ वर्ष होकाराची वाट पाहिली अन्…

व्यंकय्या नायडूंच्या या ट्वीटवर मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमानने प्रतिक्रिया देत ‘मनपूर्वक आभार’ असं म्हटलं आहे. ‘सिता रामम्’ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना आणि अभिनेता तरूण भास्करनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former vice president vaikaiah naidu praises mrunal thakur dulquer salmaan starrer tollywood film sita ramam kak
First published on: 19-08-2022 at 20:26 IST