बॉलिवूडच्या आगामी ‘पीके’ या बहुचर्चित चित्रपटाचे मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच, आमिरने ट्विटरवरूनच ‘पीके’चे चौथे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यापूर्वीच्या पोस्टरवर आमिर खान पोलिसांच्या तर संजय दत्त बँडवाल्याच्या पोशाखात पहायला मिळाले होते. मात्र, नवीन प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर हे दोघे जण बँडवाल्यांचा पोशाखात दिसत आहेत. हे पोस्टर प्रदर्शित करताना आमिरने पुन्हा एकदा आपल्या भैरोसिंह या मित्राची ओळख करून दिली असून, त्याला भैय्या म्हणत असल्याचेदेखील आमिरने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
Humra phiren… Ouka naam hai Bhairao, lekin hum ouka bulawat hai Bhaaya… pic.twitter.com/RmvJ9GZBkk
— Aamir Khan (@aamir_khan) September 17, 2014
प्रमोशनच्या या आगळ्यावेगळ्या तंत्रामुळे ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटात आमिर खानबरोबर अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत आणि बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे आणखी सहा पोस्टर्स प्रदर्शित होणार असून, येत्या १९ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.