scorecardresearch

फॉक्स स्टार स्टुडिओ करणार अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ ची निर्मीती

‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ आणि ‘फॅन्टम फिल्मस्’ एकत्रीतपणे अनुराग कश्यप यांचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा महत्वाकांक्षी चित्रपट निर्माण करणार आहेत. चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ आणि ‘फॅन्टम फिल्मस्’ एकत्रीतपणे अनुराग कश्यप यांचा  ‘बॉम्बे वेल्वेट’ हा महत्वाकांक्षी चित्रपट निर्माण करणार आहेत. चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  याचे चित्रीकरण जुलै महिन्यात सुरू होणार असून २५ डिसेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शीत केला जाणार आहे. प्रेम, लोभ आणि हिंसा यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई कशाप्रकारे मॅट्रो शहर बनले हे या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इतिहासकार ‘ज्ञान प्रकाश’ यांचे पुस्तक ‘मुंबई फेबल्स’ वर हा चित्रपट आधारीत आहे. प्रकाश यांनी चित्रपटाच्या पटकथेवर देखील काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-05-2013 at 05:44 IST

संबंधित बातम्या