‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्तानं कलाकारांची एचआयव्हीग्रस्त मुलांसोबत अनोखी ‘पार्टी’

‘पार्टी’ चित्रपटाच्या टीमनं एचआयव्हीग्रस्त मुलांसोबत फ्रेंडशिपडे साजरा करत या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे.

फ्रेंडशिप डे च्या या धम्माल 'पार्टी'चा मनमुराद आनंद लुटला.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. मैत्रीचा हा दिवस जगभरात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्तानं ‘पार्टी’ चित्रपटाच्या टीमनं एचआयव्हीग्रस्त मुलांसोबत फ्रेंडशिपडे साजरा करत या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे. डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं सर्व कलाकारांनी मुलांशी संवाद साधत, त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या.

मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या पार्टीचं दिग्दर्शन सचिन दरेकर करणार आहे. त्यानिमित्तानं चित्रपटातल्या कलाकारांनी सगळ्यांची भेट घेतली. गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या डिझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये ही अनोखी ‘पार्टी’ साजरी झाली. यावेळी मुलांनी चित्रपटातील ‘भावड्या’ या गाण्यावर ठेका धरत, फ्रेंडशिप डे च्या या धम्माल ‘पार्टी’चा मनमुराद आनंद लुटला.

या चित्रपटात सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर ,प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत असून, या सहाजणांची घट्ट मैत्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Friendship day 2018 party movie team celebrate friendship day with hiv children

ताज्या बातम्या