scorecardresearch

प्रार्थना बेहेरेने फ्रेंडशीप डे निमीत्ताने लाँच केले गाणे!

‘आपली यारी’ असे या गाण्याचे नाव आहे.

प्रार्थना बेहेरेने फ्रेंडशीप डे निमीत्ताने लाँच केले गाणे!
आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. सलमान खानची फिल्म बॉडीगार्डमूळे प्रार्थना आणि निखीलची फ्रेंडशीप झाली. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे आपली यारी हे गाणे नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज केले. फ्रेंडशीप डेच्या मुहूर्तावर आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

‘आपली यारी’ गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडियाइन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या गाण्याविषयी बोलताना म्हणाली, “नादखुळा या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-07-2021 at 19:33 IST

संबंधित बातम्या