गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ या चित्रपटाला ऑस्कला पाठवण्याच्या निर्णयावरुन फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्यांच्या निवड समितिची बऱ्याच लोकांनी कठोर शब्दात आलोचना केली आहे. ‘आरआरआर’ किंवा ‘द कश्मीर फाईल्स’सारख्या चित्रपटांना डावलून फेडरेशनने हा निर्णय घेतल्याने बरेच चित्रपटरसिकदेखील निराश आहेत. आता हा चित्रपट मूळ भारतीय चित्रपट नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे आणि त्यावरूनच एक नवा वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी (FWICE) या संस्थेने या चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘छेलो शो’ हा मूळ भारतीय चित्रपट नसून एका इटालियन ऑस्कर विजेत्या चित्रपटाची कॉपी असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. फिल्म फेडरेशनच्या अध्यक्षांनी हा चित्रपट ऑस्करसाठी का योग्य आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण हा चित्रपट एका परदेशी चित्रपटाची नक्कल आहे याविषयी मात्र त्यांनी भाष्य करायचं टाळलं आहे.

तसेच हा चित्रपट बाहेरील देशातील संस्थांनी प्रोड्यूस केला असल्याने या चित्रपटाला भारतीय चित्रपट तरी का म्हणावं असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर फेडरेशनचे अध्यक्ष टिपी अगरवाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “माझ्याकडे यासंदर्भात काही खात्रीलायक माहिती नाही, त्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. आम्ही हा चित्रपट सगळ्या ज्यूरी मेंबर्सना दाखवला आहे. यातील एकही सीन कॉपी नसल्याचं त्यांनी कित्येकदा नमूद केलं आहे.”

आणखी वाचा : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बॉलिवूडला सल्ला; ट्वीट करत म्हणाले, “शून्यातून उभं राहायचं असेल तर…”

‘छेलो शो’ या चित्रपटाची कथा ९ वर्षाच्या एका लहान मुलाच्या चित्रपटप्रेमाभोवती फिरते. सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये घडणारी ही घटना दिग्दर्शक पान नलिनी यांच्या आयुष्यापासून प्रेरित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ऑस्कर मिळो अथवा न मिळो पण चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fwice says indias official oscar entry chello show is not even an original indian film avn
First published on: 25-09-2022 at 08:23 IST