गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत गदिमा पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिला जाणार आहे. तर गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात येणार आहे. नुकतंच गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेते नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली आहेत. तसेच अनेक गावांना ते सढळ हस्ते मदत करतात. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रतिष्ठित गदिमा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

त्यासोबतच गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार यंदा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात येणार आहे. तर गदिमा चैत्रबन पुरस्कार हा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच स्व. विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा विद्या प्रज्ञा पुरस्काराने गायिका रश्मी मोघे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ‘देवमाणूस २’ च्या पहिल्या एपिसोडचा मुहूर्त ठरला, १ तासाच्या विशेष भागाने होणार सुरुवात

दरम्यान येत्या मंगळवारी १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप २१ हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadima award announced to veteran actor nana patekar and nivedita saraf nrp
First published on: 07-12-2021 at 16:19 IST