scorecardresearch

Premium

नितीन गडकरींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहता येणार; चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर, प्रदर्शनाची तारीखही ठरली

नितीन गडकरींच्या जीवनावर चित्रपट बनवणारे दिग्दर्शक म्हणाले, “त्यांचे वैयक्तिक आयुष्य अन्…”

nitin gadkri biopic
नितीन गडकरींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (फोटो – नितीन गडकरी PTI, पोस्टर – PR)

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामासाठी विशेष ओळखले जातात. नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

“ते मेसेजेस मी…”, सुशांतसोबतच्या खासगी चॅट्सबद्दल स्पष्टच बोलली रिया; म्हणाली, “बेडरूममध्ये कॅमेरा बसवला…”

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
Prabhavalkar Rohini Hattangadi
अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे.

Nitin Gadkari movie poster
नितीन गडकरींच्या चित्रपटाचे पोस्टर

“त्याने त्याचा जीव का घेतला हे…”, रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या मृत्यूवर भाष्य; म्हणाली, “मला काळी जादू…”

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणाले, “नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहीत आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात
आला आहे.”

हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग भुसारी आहेत. पण चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारत आहे, याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadkari movie based on minister nitin gadkari life poster and release date out hrc

First published on: 06-10-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×