एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरात एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. केवळ भरतातच नव्हे तर साऱ्या जगभरात या चित्रपटाची चर्चा आहे. जपान आणि इतर काही मोठ्या देशात या चित्रपटाने बरेच रेकॉर्डदेखील मोडीत काढले आहेत. यावर्षी हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची चर्चादेखील सुरू होती, पण मुख्य चित्रपट म्हणून याला ऑस्करसाठी पाठवलेलं नसलं तरी यातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला उत्कृष्ट गाण्यांसाठी ऑस्करमध्ये निवडलं आहे.

जगातील कानाकोपऱ्यातून या चित्रपटाबद्दल आपल्याला कौतुक ऐकायला मिळत आहे. नुकतंच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्री नॅथली इमॅन्युएल हिनेदेखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. सुरुवातीला तिने या चित्रपटाबद्दल वापरलेल्या ‘sick’ या शब्दांमुळे लोकांचा गोंधळ उडाला, पण नंतर तिनेच हा शब्द ‘महान किंवा उत्कृष्ट’ चित्रपट या अर्थाने वापरल्याचं स्पष्ट केलं आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : “मराठी मनोरंजनसृष्टीबद्दल मला…” बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळवणाऱ्या देवदत्त नागेचं वक्तव्य चर्चेत

‘आरआरआर’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील अल्लूरि सीतारमन आणि कोमराम भीम या दोन क्रांतिकरकांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. शिवाय या दोघांमधील घनिष्ट मैत्री आणि तितकाच तीव्र संघर्ष याचं चित्रण या चित्रपटातून केलं गेलं आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

याच चित्रपटातील काही स्क्रीनशॉट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत नॅथली इमॅन्युएलने याचं कौतुक केलं आहे. “आरआरआर हा एक महान चित्रपट आहे.” असं तिने तिच्या या ट्विटर थ्रेडमध्ये म्हंटलं आहे. याबरोबरच तिने या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याचीसुद्धा प्रशंसा केली आहे. राजामौली यांचा हा सुपरहीट ‘आरआरआर’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.