scorecardresearch

Video : गणेश आचार्यनं दाखवली Oo Antava ची हूक स्टेप, सामंथा- अल्लू अर्जुनला आवरेना हसू

सध्या सोशल मीडियावर पुष्पा चित्रपटातील ‘ऊं अंटावा’ या गाण्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे.

ganesh acharya, allu arjun, samantha ruth prabhu, oo antava song, pushpa the rise, गणेश आचार्य, सामंथा रुथ प्रभू, अल्लू अर्जुन, पुष्पा, ऊं अंटावा
या गाण्याच्या चित्रिकरणाचा एक व्हिडीओ नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटीवरही प्रचंड गाजला. विशेषतः या चित्रपटातील आयटम साँग ‘ऊं अंटवा’ची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर तर या गाण्याचे अनेक रिल्स व्हायरल झालेले दिसत आहेत. पण हे गाणं जेव्हा चित्रित केलं जात होतं त्यावेळी सेटवर बऱ्याच गमती-जमती घडल्या. ज्याची झलक एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या चित्रिकरणाचा एक व्हिडीओ नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गणेश आचार्य यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. यात ते पुष्पा चित्रपटाच्या सेटवर अभिनेता अल्लू अर्जुन आणि सामंथा रुथ प्रभू यांच्यासोबत दिसत आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊं अंटावा’ या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते गाण्याची हूक स्टेप करताना दिसत आहेत. पण त्यांना डान्स करताना पाहून अल्लू अर्जुन आणि सामंथाला आपलं हसू थांबवणं कठीण झालेलं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

गणेश आचार्य यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ‘ऊं अंटावा’ गाण्याच्या चित्रिकरणाचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘माझ्या आवडत्या व्यक्तींसोबत आणखी एक हीट, सेटवर या दोघांसोबत सर्वाधिक काळ मजेत घालवण्याची संधी मला मिळाली.’ आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी अल्लू अर्जुन आणि सामंथा यांनाही टॅग केलं आहे.

दरम्यान अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे याच चित्रपटाबद्दल बोललं जात आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १ महिना उलटला तरीही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ अद्याप दिसून येत आहे. विशेषतः या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ आणि ‘ऊं अंटावा’ या दोन गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. युट्यूबवर ही दोन्ही गाणी अद्याप ट्रेंडमध्ये आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh acharya share bts video of oo antava song with allu arjun and samantha ruth prabhu mrj

ताज्या बातम्या