१२ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी गौहर खान ‘या’ दिवशी करणार लग्न

सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितली लग्नाची तारीक

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा ती संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारला डेट करत असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपूडा झाल्याचे समोर आले होते. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरने तिच्या लग्नाची तारीक सांगितली आहे.

नुकताच गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड झैद दरबारसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने तिच्या लग्नाची तारीक सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

गौहरने शेअर केलेले फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने लेहेंगा परिधान केला आहे. त्यावर तिने साजेशी ज्वेलरी परिधान केली आहे. त्या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोसोबत गौहरने ‘२५ डिसेंबर २०२०’ असे कॅप्शन दिले आहे.

गौहर आणि झैनच्या लग्नाच्या दोन दिवस आधी सर्व विधी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या लग्नसोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे झैद?
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gauahar khan will marry zaid darbar on 25th december avb

ताज्या बातम्या