गौतमीने शेअर केला पती राम कपूरसोबतचा हनीमूनचा ‘तो’ फोटो; नेटकरी म्हणाले…

राम कपूर आणि गौतमीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय.

ram-kapoor-gautmi
(Photo-Instagram@gautamikapoor)

छोट्या पडद्यावरील कपलपैकी एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य करणारी जोडी म्हणजे अभिनेता राम कपूर आणि अभिनोत्री गौतमी कपूर. ‘घर एक मंदिर’ या मालिकेतू राम आणि गौतमी एकत्र झळकले होते. या मालिकेवेळीच त्यांच्यात जवळीक वाढली. २००३ सालामध्ये राम आणि गौतमी विवाह बंधनात अडकले. दोघांच्या लग्नाला नुकतीच १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी गौतमीने रामसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. गौतमीने हनीमूनवेळीचा एक स्पेशल फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

गौतमीने सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केलाय. या फोटोत गौतमीचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. तर शॉट्स परिधान केलेला राम कपूरदेखील या फोटोत खूपच फिट दिसत आहे.  हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये गौतमीने लिहलं, “ते वर्ष होतं. २००३” या फोटोला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसतेय. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात खास करून राम कपूरचा फिट लूक पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Kapoor (@gautamikapoor)

हे देखील वाचा: सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवले जात आहेत, नाझी जर्मनीत हेच व्हायचं- नसीरुद्दीन शाह

या महिन्यातच १ सप्टेंबरला राम कपूरचा वाढदिवस होता. यावेळी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ राम कपूरने शेअर केला होता.

राम कपूर आणि गौतमीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. मात्र ‘घर एक मंदिर’ या मालिकेतील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gautami kapoor share honeymoon unseen photo with husband ram kapoor goes viral kpw