Gautami Patil Dance On Akshaye Khanna Song : अक्षय खन्ना सध्या त्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेच, पण त्याचसोबत त्याचा Fa9la डान्स सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे. नेहमी गंभीर तसंच विनोदी भूमिकांमध्ये पाहिलेला अक्षय खन्ना इतक्या सहज आणि आनंदी अंदाजात नाचताना पाहून चाहते सुखावले आहेत. त्याच्या या गाण्याची भुरळ केवळ चाहत्यांनाच नव्हे तर कलाकारांनाही पडली आहे.
‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेली ‘रहमान डकैत’ची भूमिका आणि त्याची गाण्यातील एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fa9la या गाण्याचा सोशल मीडियाकर ट्रेंड झाला आहे आणि हा ट्रेंड सगळेच फॉलो करत आहेत. कलाकार मंडळीसुद्धा अक्षय खन्नाच्या या व्हायरल गाण्यावर अनेक व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच गौतमी पाटीललासुद्धा अक्षयच्या गाण्यावर व्हिडीओ करण्याचा मोह आवरता आला नाही.
गौतमी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या लावणीनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी गौतमी तिच्या या अक्षय खन्नाच्या Fa9la गाण्यावरील डान्सनंसुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मोकळे केस आणि काळा गॉगल असा लुक करीत तिनं रस्त्याच्या शेजारी Fa9la गाण्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. गौतमीचा हा Fa9la गाण्यावरील व्हिडीओ चाहत्यांनासुद्धा चांगलाच आवडला आहे.
‘मस्त हा मस्त’, ‘सबसे कातील गौतमी पाटील’, ‘हीच खरी हिरोईन’, ‘खूप छान’, ‘परफेक्ट’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच अनेकांनी या व्हिडीओखालील कमेंट्समध्ये हार्ट इमोजीच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.
गौतमी पाटील डान्स व्हिडीओ
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवला आहे. ५ डिसेंबरला रिलीज झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सिनेमातील अॅक्शन सीन्स, कलाकारांचा अभिनय आणि डान्स अशा अनेक बाबींमुळे ‘धुरंधर’ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सिनेमानं ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
