scorecardresearch

Premium

“ती काही…”, गौतमी पाटीलच्या डान्सवर टीका करणाऱ्यांना तिच्या वडिलांनी थेट सुनावलं

गौतमी पाटीलच्या वडिलांना मुलीच्या डान्सवर होणाऱ्या टीकेबद्दल काय वाटतं? जाणून घ्या प्रतिक्रिया

Gautami-Patil father
गौतमी पाटील व तिचे वडील बाबूराव नेरपगारे पाटील

गौतमी पाटीलच्या डान्समुळे तिच्यावर सातत्याने टीका होत आहे. ती अश्लील हावभाव करत डान्स करते, असा आरोप तिच्यावर केला जातो. यावरून वाद वाढल्यावर तिने माफीही मागितली, पण वाद शमण्याचं नाव घेत नाही. अशातच तिच्या आडनावावरूनही वाद सुरू झाला. गौतमी पाटीलचे वडील तिच्याबरोबर राहत नाहीत. पण पहिल्यांदाच त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी गौतमीच्या डान्सबद्दल मत व्यक्त केलं.

हेही वाचा – गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर, लेकीच्या आडनावाच्या वादावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

‘एबीपी माझा’शी बोलताना गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी तिच्या डान्सबद्दल प्रतिक्रिया दिली. गौतमीचा डान्स कधी पाहिलाय का? असा प्रश्न त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, “माझ्या घरी टीव्ही नाही. मी दुसऱ्यांच्या फोनमध्ये तिचा डान्स पाहिला आहे. तिचा डान्स आवडतो, पण थोडं वाईटही वाटतं.”

हेही वाचा – गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय?

“गौतमीच्या डान्सवर टीका करणाऱ्यांनाही तिच्या वडिलांनी उत्तर दिलं. टीका करण्याऱ्यांनी तिला अशा पद्धतीने बोलायला नको. मी मुलीच्या बाजूने आहे. ती काही वाईट करतेय का? टीका करणारे लोक भरपूर असतात. कुणी घोड्यावर बसू नको म्हणतं, तर कुणी पायी चालू नकोही म्हणतं. लोक काही ना काही बोलतच असतात,” असं गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील म्हणाले.

हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”

गौतमीचे वडील जवळपास १८-२० वर्षांपासून वेगळे राहतात. सुरुवातीला ते पुण्यात कामाला होते, आता ते जळगाव जिल्ह्यात राहतात. लेकीच्या डान्सबद्दल त्यांना काहीच आक्षेप नाही. तसेच मुलीच्या आडनावावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गौतमी पाटील घराण्यातली आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही मुलीला दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 08:52 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×