लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद पुढे खूपच चिघळला. आता याच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या सर्व प्रकरणानंतर बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मेघा घाडगे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

मेघा घाडगे या सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच मेघा घाडगे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने गौतमी पाटीलवर टीका केली आहे. त्याबरोबर एक फेसबुक लाईव्हद्वारेही मेघा घाडगेने याबद्दल भाष्य केले आहे. सध्या तिची ही पोस्ट आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

Five youths attempted self immolation in Abdul Sattar office Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: मंत्री सत्तारांच्या कार्यालयात पाच तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Rashmi Thackeray, Maha Aarti, Tembhinaka,
रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला
MP son car hit two-wheeler, Mumbai,
मुंबई : खासदार पुत्राच्या मोटरगाडीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी, गणेश हंडोरे अटकेत
tamil nadu cm mk stalin appointed his son udhayanidhi as deputy chief minister
अन्वयार्थ : घराणेशाही कालबाह्य!
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
sambhajinagar ganesh mandal fight marathi news,
छत्रपती संभाजीनगर: गणेश मंडळांमधील वाद, तरुण अत्यवस्थ; मुलाच्या परिस्थितीस पोलीस कारणीभूत, पित्याचा आरोप
bjp sanju Srivastava rape case marathi news
वसई: बलात्काराच्या तक्रारीनंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष फरार, पक्षाने केली पदावरून हकालपट्टी

मेघा घाडगेची पोस्ट

“खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं. का या शाहिरानीं कवन लिहिली???

पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं . विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले आत्ता माझे डोळे उघडले.

मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको ..? लक्षात नाही तू घातले होतेस का?

काल तर प्रेक्षकांना मधनं गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून . पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो पिचर बाकी हैं…!!

आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीझ मला हे सगळं शिकावं अल्बम मध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र ) ते ही आयटम साँग म्हणून. पण स्टेज वर नाही केल कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का??

कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय, घुंगरू, शालू.. विकणे आहे .. प्लीझ मेसेज करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … लव्ह यू गौतमी”, अशी पोस्ट मेघा घाडगेने लिहिली आहे.

आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

याबरोबरच मेघा घाडगेने एक फेसबुक लाईव्ह करत गौतमी पाटील आणि तिच्या अश्लील लावणीबद्दल संताप व्यक्त केला आहे. “मी माझ्या सर्व साड्या, घुंगूर विकायला काढल्या आहे. कोणाला हव्या असतील तर प्लीझ घ्या. कारण सध्या नवीन लावणी सुरु झाली आहे. लावणी परंपरा सुरु झाली आहे. यामुळे एक नवा इतिहास रचला जाणार आहे. तसेच मी सर्व पदर कापणार आहे. मी यापुढे तिचे शिष्यत्व पत्करणार आहे. तिच्याबरोबर एक लावणीचा नव्हे अदाकारीचा कार्यक्रमही करणार आहे. तो नक्की बघा. त्यावेळी मी सगळ्यांसमोर माझा पदर काढणार आणि घुंगूरु असे घेणार आणि तुम्हाला देणार”, असेही मेघा घाडगे तिला म्हणाली.