गौतमी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार नाव. आपल्या नृत्य कौशल्याने आणि कातिल अदाने गौतमीने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे मुलाचा वाढदिवस असो किंवा बैलाचा वाढदिवस असो कुठल्याही समारंभाला गौतमीचा डान्स कार्यक्रम आयोजित केला जातो. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशी ही महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावणारी गौतमी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहे. यावेळी ती बालपणापासून केलेला संघर्ष ते आता असलेल्या सद्यपरिस्थितीवर बोलत आहे. हेही वाचा - Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर नुकतीच गौतमी पाटीलने 'न्यूज १८ लोकमत' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, 'जे सेलिब्रिटी आहेत, ते तुला सेलिब्रिटी मानतात का? कधी त्यांना तू भेटली आहेस?' यावर गौतमी म्हणाली की, "ज्यांचे त्यांचे विचार असतात. खरंतर ज्यांना मी आवडते ते नक्की माझ्या गोष्टी स्वीकारतात. माझं असं असतं की, जे आहे ते आहे. बरेच लोकं आहेत, ज्यांना मी पटतं नाही. पण ज्यांचे त्यांचे विचार." हेही वाचा - Video: आता ड्रामा क्वीन राखी सावंतवर येणार बायोपिक; स्वतः केलं जाहीर, म्हणाली, “आलिया भट्ट आणि विद्या बालन…” त्यानंतर गौतमीला विचारलं जातं की, 'तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?' या प्रश्नाचं गौतमी कौतुकास्पद उत्तर देते आणि म्हणते की, "माझी आई." हेही वाचा – “आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…” हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची बातमी समोर आली होती. ‘घुंगरू’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची गौतमीचे चाहते वाट बघत आहेत.