सध्या महाराष्ट्रभर नृत्यांगना गौतमी पाटीलचं नाव प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तर तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये घडणाऱ्या विचित्र घटनाही सध्या चांगल्या गाजत आहेत. विरारजवळील एका गावामध्ये तर सत्यनारायणाच्या पुजेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुनही तिच्यावर बरीच टीका करण्यात आली. सध्या गौतमी पाटील हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत आहे. यादरम्यानच आता शाहीर संभाजी भगत यांनी गौतमीबाबत फेसबुकद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. गौतमीला काही महिन्यांमध्येच बरीच लोकप्रियता मिळाली. ती करत असलेलं नृत्य, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे याला अनेकजण अजूनही विरोध दर्शवत आहेत. तर काहींनी गौतमीच्या या नृत्याला पाठिंबाही दिला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही. तिने पाटील आडनाव लावू नये असा नवा वाद सुरू झाल आहे. याबाबतच शाहीर संभाजी भगत यांनी संतप्त पोस्ट शेअर केली आहे. आणखी वाचा - “माझे वय ६० वर्ष नाही तर…”, व्हिडीओ शेअर करत आशिष विद्यार्थी यांचा खुलासा, दुसऱ्या पत्नीच्या वयाबाबत म्हणाले… ते म्हणाले, "नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटतं? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण…ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे. नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये. आजपर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्यामधील जात्यंध पुरुष दुखवतो. म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे. पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं असं का वाटत नाही? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला पुढे का येत नाहीत?" काय आहे पोस्ट? आणखी वाचा - ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली… "मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे. भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे. ते पुरुषसत्ताक तर आहेतच पण ते जात्यंधसुद्धा आहेत. म्हणून बलात्कारित स्त्रीकडेही ते अशाच घाणेड्या पद्धतीने बघतात. तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात. दुसऱ्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्यापेक्षा खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात. बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात. स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच. पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितलं जातं तिनेही याबाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवं". संभाजी भगत यांच्या या पोस्टवर अनेकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.