बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधली. गेल्याच महिन्यात या जोडप्याच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले. हरभजन-गीताला कन्यारत्न झाल्याची बातमी कळताच त्यांच्यावर सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. यावर गीता बसराने सर्वांच्या शुभेच्छांसाठी ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. त्याचसोबत तिने आपल्या चिमुकल्या लेकीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत हरभजनच्या लेकीने आपल्या इवलुश्या हातात आईचे बोट पकडलेले दिसते.


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमाल आर खान याने हरभजन-गीताच्या आई-बाबा होण्यावरून खिल्ली उडवली होती. इतरांवर नेहमी टीका करण्यासाठी किंवा खिल्ली उडवण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कमार आर खान याने विचित्र ट्विट केले होते . काय परफेक्ट प्लॅनिंग आहे, असे त्याने ट्विटद्वारे म्हटले होते. कमाल आर खानने ट्विटमध्ये लिहलेले की, हरभजन सिंगने गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला लग्न केले होते. त्याच्या घरी २८ जुलै २०१६ साली मुलीने जन्म घेतला. बरोबर नऊ महिन्यांनंतर तो बाबा झाला, याला म्हणतात खरी प्लॅनिंग.