सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?, ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा खुलासा

राजचे हे चित्रपट बॉलीफेम नावाच्या एका अॅपवर प्रदर्शित करण्यात येणार होते.

sai tamhankar, raj kundra
बॉलीफेम नावाचं एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु असल्याचं गहाना वशिष्ठने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आणि म्हणाली की राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. त्यासोबत गहनाने मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव घेतलं आहे.

गहनाने ‘नवभार टाईम्स ऑनलाईन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. “तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी कळले की बॉलीफेम नावाचं एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती. त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एक-एक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला. मला अटक होण्याच्या ३ ते ४ दिवस आधी मी त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत होते. मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते,” असे गहना म्हणाली.

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

दरम्यान, या आधी गहनाने एक व्हिडीओ शेअर करत राज कुंद्राचे समर्थन केले आहे. “आम्ही पॉर्न व्हिडीओ बनवत नाही. हे सगळे व्हिडीओ एकता कपूरच्या ‘गंदी बात’सारखेच आहेत. आमच्या सीरिजमध्ये एकता कपूरच्या सीरिजपेक्षाही कमी कामुकता आहे. जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात कुठेच अश्लिलता नाही. ते अश्लील चित्रपट नाहीत. ज्यांना शंका आहे त्यांनी गुगलवर जाऊन बघावं. त्यापैकी कोणताच चित्रपट पॉर्न श्रेणीत मोडला जाऊ शकत नाही. आमचे प्रेक्षक हे १८ वर्षांच्या पुढचे आहेत. त्यामुळे त्यांना पॉर्न आणि इरॉटिक चित्रपटांमधला फरक कळतो,” असे गहना म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gehana vasisth claims raj kundra was planning to launch new app and cast sai tamhankar and sharmila shetty for movies dcp