“माझ्या प्रिय बाळा…”, मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाची भावूक पोस्ट

यानिमित्ताने जिनिलयाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून ही येतं. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. रितेश आणि जिनिलियाचा मोठा मुलगा रियानचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने जिनिलयाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“माझ्या प्रिय बाळा, माझ्या तुझ्यासाठी लाखो इच्छा, आकांक्षा आणि शुभेच्छा आहेत. पण त्या माझ्या आहेत तुझ्या नाहीत. त्यामुळेच मी आज तुला एक वचन देऊ इच्छिते की, मी यापुढे तुझ्या इच्छा नेहमी माझ्याआधी ठेवेन. जेव्हा तुला उडायचे असेल तेव्हा मी तुझे पंख बनण्याचा प्रयत्न करणार नाही. तर तुझ्या पंखाखालील वारा होण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा कधी तू पहिले स्थान मिळवणार नाही, त्यावरुन मी कधीही निराश होणार नाही. पण त्याच वेळी तुला दुसऱ्या स्थानाचे महत्त्व पटवून देईन. तसेच कदाचित तुला हे दाखवून देईन की रांगेत शेवटच्या स्थानावर असण्याचे स्वत:चे वेगळेपण आहे, हे समजावून सांगेन,” असे जिनिलियाने यात म्हटले आहे.

“पण तुम्हाला सर्वाधिक खात्री देते की एखादा आनंद देण्यासाठी मी नेहमी तुमच्या समोर असेन. तुमच्या नेहमी पाठिशी, आजूबाजूला असेन. जेणेकरुन तुम्ही एकटे पडणार नाही, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,” असेही जिनिलिया म्हणाली. ही संपूर्ण पोस्ट शेअर करताना जिनिलियाने तिच्या दोन्ही मुलांसोबतचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. यात ती फार मस्ती करताना दिसत आहे.

हेही वाचा : “अरे ताई म्हण…ताई”, जिनिलियाचा ‘तो’ भन्नाट व्हिडीओ व्हायरल

दरम्यान जिनिलिया ही नेहमीच मुलांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी जिनिलियाने तिचा मोठा मुलगा रियानसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. यात जिनिलिया व्हिडीओच्या सुरुवातीला “Hii Guys, ही मी आहे आणि हा… तू कोण आहेस रे?” असा प्रश्न विचारताना दिसते. जिनिलियाचा हा प्रश्न पाहून रियान दोन सेकंद गोंधळात पडतो. त्यावेळी त्याचे हावभाव फार सुंदर दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Genelia deshmukh birthday wish to riaan instragram post viral nrp

ताज्या बातम्या