Genelia Deshmukh Emotional Post For Vilasrao Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख अनेकदा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलत असतात आणि सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत असतात. अशातच आज त्यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची सून जिनिलीयाने त्यांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
जिनिलीया देशमुखसाठी विलासराव देशमुख तिच्या विडालंप्रमाणेच होते. अभिनेत्री अनेकदा सासऱ्यांबद्दल प्रेमाणे आणि आदराने बोलत त्यांच्या आठवणींना उजाळा देत असते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत भावुक पोस्ट केली आहे. यामधून रितेश आजही त्याच्या वडिलांवर किती प्रेम करतो हे पाहायला मिळतं.
जिनिलीयाची सासऱ्यांसाठी भावुक पोस्ट
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जिनिलीयाने रितेश व त्यांच्या दोन मुलांबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश त्याच्या वडिलांना आणि त्यांची मुलं त्यांच्या आजोबांना अभिवादन करुन आशिर्वाद घेताना दिसत आहेत. या व्हिडीओला जिनिलीयाने “प्रिय पप्पा, रियान आणि राहिल नेहमी रितेशला म्हणतात, माझे बाबा सगळ्यात बेस्ट आहेत. त्यावर रितेश, तुम्ही माझ्या बाबांना कधी भेटलाच नाहीत. ते तुमच्या बाबांपेक्षा कितीतरी पटीने भारी आहेत. त्यांनी तुम्हाला भेटावं अशी आमची इच्छा होती.”
रितेशची वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट
जिनिलीयाप्रमाणे रितेशनेही सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट केली आहे. रितेश अनेकदा त्याच्या वडिलांची आठवण काढत त्यांच्याबद्दल बोलताना कौतुक करत असतो. आज त्याने वडील विलासराव देशमुख यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्याचा वनवास संपला नसल्याचं म्हटलं आहे. रितेशने या पोस्टला “तुम्हाला जाऊन १४ वर्ष झाली माझा वनवास काही संपला नाही”. अशी कॅप्शन दिली आहे.
रितेश व जिनिलीया अनेकदा त्यांच्या देशमुख कुटुंबातील सदस्यांबरोबरचेही फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. रितेश अनेकदा त्याचे दोन भाऊ, त्यांची मुलं, आईबरोबरचे सण साजरे करतानाचे, वाढदिवस साजरे करतानाचे फोटो शेअर करत असतो. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो आणि त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दलची तसेच कामाबद्दची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.
